पिंपरी - स्वीकृत सदस्य निवडीवरून शहर भाजपमध्ये निर्माण झालेला पेच दूर करण्यासाठी मंगळवारी (ता. १६) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याशी भाजपचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप मुंबईत चर्चा करणार असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. पक्षातील काही कार्यकर्त्यांनी गेल्या शनिवारी असंतोष प्रकट केल्याच्या पार्श्वभूमीवर ही बैठक होत असून, त्यात नव्याने नावे निवडली जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
No comments:
Post a Comment