Wednesday, 3 May 2017

समांतर पुलास झोपडपट्टीचा अडथळा

– हॅरिस ब्रिजला समांतर ब्रिज: एकूण 23 कोटी रुपयांचा खर्च 
पिंपरी, (प्रतिनिधी) – पुणे-मुंबई महामार्गावर हॅरिस ब्रिजला समांतर उभारण्यात येत असलेल्या पुलाचे काम पिंपरी-चिंचडवड महापालिकेकडून युद्धपातळीवर सुरु आहे. येत्या दीड वर्षांत पुलाचे काम पूर्ण करण्यासाठी दोन्ही महापालिकेकडून निधी उपलब्ध केला आहे. त्या पुलासाठी 24 कोटी रुपयांची अंदाजपत्रकीय तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे महामार्गावरील वाहतूक कोंडीचा प्रश्‍न सुटणार आहे. मात्र, समांतर पूल उभारणीच्या कामास पुणे मनपा हद्दीतील झोपडपट्टीचा अडथळा निर्माण झाला आहे. याबाबत पुणे मनपाला “पीसीएमसी’कडून पत्रव्यवहार करुनही प्रतिसाद मिळालेला नाही. परिणामी, डाव्या बाजूच्या पुलाचे काम रखडण्याची शक्‍यता आहे.

No comments:

Post a Comment