पिंपरी : सध्याची तरुणाई सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात करताना दिसून येते. यामध्ये अनेकजण केवळ 'टाईमपास' म्हणून सोशल मीडियाकडे पाहतात. मात्र, सोशल मीडियावरील अनेक समुहांनी समाजाच्या उपयोगी पडणारे अनेक विधायक कामे करण्यास सुरवात केल्याची अनेक उदाहरणे आहेत. त्यामधीलच एक उदाहरण म्हणजे तुरीचा मुद्दा चांगलाच गाजत असताना, शहरी भागात राहणार्या किसानपुत्रांनी तुरडाळ महोत्सव भरवण्याचे ठरवले. फेसबुक आणि व्हॉटस् अॅपच्या माध्यमातून एकत्र आलेल्या किसानपुत्रांनी भोसरीमधील इंद्रायणीनगरमध्ये रविवार (दि. 7) या दोन दिवशी पहिला तूरडाळ महोत्सव महोत्सव आयोजित केला आहे.

No comments:
Post a Comment