पिंपरी - राजीनाम्यासाठीचा दबाव, कंपनीकडून कामाची गुणवत्ता चांगली नसल्याचा अहवाल अशा कारणांमुळे माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर नोकरी जाण्याची टांगती तलवार आली आहे. या परिस्थितीवर मार्ग काढण्यासाठी हिंजवडी आयटी पार्कमधल्या काही कंपन्यांतील सुमारे वीस कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन कामगार आयुक्त कार्यालयाचा दरवाजा ठोठावला आहे. कामगार आयुक्तांनी या प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी गुरुवारी (ता. १५) संबंधित आयटी कंपन्यांना बोलावून त्यांना लेखी म्हणणे सादर करण्याचे पत्र दिले असल्याचे कामगार उपायुक्त निखिल वाळके यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment