Friday, 23 June 2017

पुण्याच्या रिंग रोड प्रकल्पाच्या अंमजबजावणीस प्राधिकरणाची मंजुरी

  • सात वर्षांत होणार दोन टप्प्यांचे काम
  • मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत मान्यता
मुंबई – हवेली, मावळ, मुळशी व खेड या चार तालुक्‍यांना जोडणारा पुण्याचा महत्वकांक्षी रिंगरोड प्रकल्प सुसाट होणार आहे. दोन टप्प्यात उभारण्यात येणाऱ्या या रिंग रोड प्रकल्पाच्या अंमजबजावणीसाठी नगर रचना योजना राबविण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या प्राधिकरणाच्या बैठकीत गुरुवारी मान्यता देण्यात आली.
पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाच्यावतीने (पीएमआरडीए) रिंगरोड प्रकल्प उभारण्यात येणार आहे. पुणे प्राधिकरणाची गुरुवारी मुख्यमंत्र्यांच्या “वर्षा’ निवासस्थानी झाली. रिंगरोडच्या वित्तीय आराखड्याचे सादरीकरण यावेळी करण्यात आले याला प्राधिकरण सभेने मान्यता दिली. यावेळी पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्यासह महापौर मुक्ता टिळक, पिंपरी- चिंचवडचे महापौर नितीन काळजे, मुख्य सचिव सुमीत मल्लिक, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रविणसिंह परदेशी, महसूल विभागाचे प्रधान सचिव मनुकुमार श्रीवास्तव, नगर विकास विभागाचे प्रधान सचिव नितीन करीर, पुणे महानगरपालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष मुरलीधर मोहोळ, पिंपरी- चिंचवड महानगर पालिकेच्या स्थायी समिती अध्यक्ष सीमा सावळे, पुणे विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी, पोलीस आयुक्त रश्‍मी शुक्‍ला, पुणे महानगरपालिका आयुक्त कुणाल कुमार उपस्थित होते.

No comments:

Post a Comment