Monday, 12 June 2017

आता पालिका हददीतही विद्युत वितरण नियंत्रण समित्या

– महिन्याभराच्या आत समिती समिती स्थापन करा, शासनाची सूचना 
– समिती स्थापन करण्याची जबाबदारी पालिका आयुक्तांवर 
पुणे, ( प्रतिनिधी) – महापालिका क्षेत्रातील वीज पुरवठयाबाबतच्या समस्या सोडविण्यासाठी आता विधानसभा मतदारसंघ निहाय विद्युत वितरण नियंत्रण समित्या गठीत केल्या जाणार आहेत. यापूर्वी शासनाने जिल्हा व तालुकास्तरावर अशा समित्या स्थापन केल्या आहेत. त्याच धर्तीवर महापालिकेच्या हद्दीत अशा समित्या स्थापन करण्याचे अधिकार शासनाने महापालिका आयुक्तांना दिले आहेत. ही समिती एका महिन्याच्या आत स्थापन करणे बंधनकारक असल्याचे राज्यशासनाने दिलेल्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment