पिंपरी - महापालिकेची सत्ता हस्तगत करून जेमतेम तीन महिने लोटलेले असताना सत्ताधारी भाजप पदाधिकाऱ्यांत मानापमान नाट्य सुरू झाले आहे. मोटारीचे निमित्त पुढे करून महापौर नितीन काळजे आणि स्थायी समितीच्या अध्यक्षा सीमा सावळे यांच्यात जोरदार खडाजंगी झाल्याचे वृत्त आहे. निमित्त मोटारीचे असले, तरी त्यामागील कारणे वेगळीच असल्याचे कळते. शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप आणि आमदार महेश लांडगे यांच्या समर्थकांतील हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे.
No comments:
Post a Comment