पिंपरी - भाटनगर, बौद्धनगर पुनर्वसन प्रकल्पात गेली काही वर्षे राजरोस गावठी दारूभट्ट्या आणि मटक्याचे अड्डे सुरू आहेत. याची महापालिका प्रशासन आणि पोलिस यांना माहिती असूनही त्याकडे जाणीवपूर्वक डोळेझाक होत आहे.
महापालिकेने झोपडीधारकांना पक्की घरे मिळावी म्हणून वीस वर्षांपूर्वी हा पहिलाच पुनर्वसन प्रकल्प राबविला. येथील काही घरांमध्ये नागरिकांनी हातभट्टीची दारू गाळून तिथेच विक्री करण्याचा धंदा थाटला. इमारतींच्या आजूबाजूलाही दारूभट्ट्या सुरू आहेत. याबाबत परिसरातील नागरिक वारंवार तक्रार करतात. पोलिस अधूनमधून यावर कारवाईचे नाट्य करतात. यामुळे परिसरात कायमच वादावादी आणि मारहाणीच्या घटना घडतात. याशिवाय रिव्हर रोडकडील कमानीजवळील टपऱ्यांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून मटका अड्डे जोमात सुरू आहेत. या अड्ड्यांवर नेहमी गुन्हेगारांचा वावर असतो. त्यामुळे परिसरातील गुन्हेगारीत वाढ झाली असून महिलांमध्ये भीतीचे वातावरण आहे. ही सर्व बाब पोलिसांना माहिती असूनही त्यावर कारवाई होत नाही.
No comments:
Post a Comment