पिंपरी - हिंजवडी आयटी पार्कमधील जटिल वाहतूक समस्या सोडविण्याच्या दृष्टीने ‘सकाळ’मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या ‘दुष्टचक्रात हिंजवडी’ या वृत्तमालिकेला वाचकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. अनेकांनी संपर्क साधत ‘सकाळ’चे विशेष आभार मानले. तसेच समाधान व्यक्त केले. दररोजच्या वाहतूक कोंडीने ग्रासलेल्या अनेक आयटीयन्सनी त्यावरील काही उपाययोजनादेखील सुचविल्या. तर महाराष्ट्राची विशेषतः पुण्याची आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख निर्माण करणाऱ्या हिंजवडीच्या समस्यांकडे शासन गांभीर्याने कधी पाहणार, असा प्रश्नही उपस्थित केला.

No comments:
Post a Comment