पिंपरी – निगडी येथील वाहतूक नगरीच्या कमानीला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव द्यावे, असा ठराव रिपाइंच्या उद्योग सेलच्या बैठकीत करण्यात आला. प्रदेशाध्यक्ष अमित मेश्राम यांच्या अध्यक्षतेखाली निगडीत बैठक झाली. आयुक्त श्रावण हर्डिकर यांना अंमलबजावणी करण्यासाठी ठरावाची प्रत निवेदनासोबत देऊन मागणी केली. यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे मेश्राम यांनी सांगितले.

No comments:
Post a Comment