चिखली - कुदळवाडी- मोशी रस्त्याच्या दोनही बाजूने मोठ्या प्रमाणात भंगार मालाची अनधिकृत दुकाने थाटण्यात आली आहेत. या दुकानांना वारंवार आगी लागतात. रसायनमिश्रित पिंप धुतले जातात, त्यामुळे हवा आणि पाण्याचे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते. परंतु, या दुकानांवर कारवाईच होत नसल्याने या अनधिकृत दुकानांनी सर्व परिसर व्यापला आहे. हा प्रकार असाच सुरू राहिल्यास भविष्यात नागरिकांना श्वास घेणेही मुश्कील होईल.

No comments:
Post a Comment