पिंपरी – भारतीय स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून पिंपरी-चिंचवड महापालिका व बॉम्बे इंजिनिरिंग ग्रुप खडकी यांच्या संयुक्त विद्यमानाने भारतीय लष्करी जवानांचे प्रात्यक्षिक व लष्करी साहित्यांचे प्रदर्शन भरविण्यात आले असून, शालेय विद्यार्थी व नागरिकांना पाहण्यासाठी खुले ठेवण्यात आले आहे, अशी माहिती महापौर नितीन काळजे व आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी पक्षनेते एकनाथ पवार, स्थायी सभापती सीमा सावळे, सहआयुक्त दिलीप गावडे आदी मान्यवर उपस्थित होते.
No comments:
Post a Comment