पिंपरी : औद्योगिक क्लस्टर विकासात दहा वर्षानंतरही उदासीनता राहिल्याची कबुली केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगमंत्री कलराज मिश्र यांनी आज (ता. 23) पिंपरी-चिंचवडमध्ये दिली. त्यामुळे आता हे क्लस्टर उभारणीवर आपला भर राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. मूलभूत सेवासुविधा आणि पुरेशा विजेअभावी महाराष्ट्रातील उद्योग गुजरातमध्ये स्थलांतरित होत असल्याचे, मात्र त्यांनी अमान्य केले. वीजटंचाईवर सौरऊर्जा हा पर्याय असून त्याला प्राधान्य देत असल्याचेही ते म्हणाले.
No comments:
Post a Comment