Monday, 4 September 2017

फ्लेक्‍समुक्‍त शहराला कारभाऱ्यांचा अडथळा

पिंपरी – महापालिका निवडणुकीत भाजपने “ना भय, ना भ्रष्टाचार’, स्वच्छ व पारदर्शक कारभाराचे आश्‍वासन शहरातील जनतेला दिले. यामुळे महापालिकेत सत्तांतर होवून भाजपची सत्ता प्रस्थापित झाली. परंतु, सहा महिन्यात भाजपचे कारभारी व काही नगरसेवकांना पारदर्शक कारभार नकोसा झाला आहे. शहरात विनापरवाना बसविलेले होर्डिंग्ज काढण्यास हे कारभारी अडथळा करु लागले आहेत. तसेच, पालिका कर्मचाऱ्यांना दमदाटी करुन होर्डिंग्ज हटविण्यास विरोध करु लागले आहेत. अनधिकृत फ्लेक्‍समुक्त शहराची घोषणा हवेत विरली असून भाजपचा पारदर्शक कारभार म्हणजे पोटात एक अन्‌‌‌ ओठांत एक अशीच स्थिती महापालिकेत दिसून येत आहे.

No comments:

Post a Comment