पिंपरी – महापालिका पाणी पुरवठा विभागातील पाणीपट्टी थकबाकीचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. सामान्य कुटूंबातील नागरिकांनी पाणीपट्टी थकबाकी न भरल्यास तातडीने त्यांचे नळ जोडणी तोडली जाते. परंतु, पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांच्या वरदहस्ताने शहरातील बड्या धेंड्याकडे कोट्यावधी रुपयांची पाणीपट्टी थकबाकी रखडली आहे. या थकबाकी वसुलीकडे पाणी पुरवठा विभागाने सोयीस्कर दुर्लक्ष केले आहे. तसेच, त्यांच्यावर नळ जोडणी तोडण्याची कारवाई केली जात नाही. त्यामुळे 30 हजारापेक्षा अधिक पाणीपट्टी थकबाकी 1 हजार 341 नागरिकांकडे राहिलेली आहे.
No comments:
Post a Comment