सर्वसाधारण सभेत ठोस निर्णय; अधिकारी लागले कामाला
शहरातील नागरीकांना मुलभूत सुखसुविधा व्यवस्थीत पुरवता याव्यात तसेच प्रशासकिय कारभारा मधे सुटसुटीतपणा येण्याच्या उद्देशाने महानगरपालिकेने विविध क्षेत्रीय कार्यालयाची स्थापणा केली. नव्याने अनुक्रमे ग, घ, या क्षेत्रीय कार्यालयाची निर्मीती झाल्याने या कार्यालयांची संख्या आता आठ झाली आहे. नव्याने तयार झालेल्या ‘ग’ क्षेत्रीय कार्यालयाला थेरगाव गावठान मधील महानगर पालीकेच्या यशवंतराव चव्हाण शाळेच्या ईमारतीमधे जागा देण्यात आली असून पहिली मासीक सर्व साधारण सभा नुकतीच पार पडली. सभापती अभिषेक बारणे यांनी पहिल्याच सभेत तत्परतेने काही ठोस निर्णय घेवून आपल्या कामाची चुनूक दखवून दिली. त्यामुळे प्रशासकीयअधिकारीआता कामाला लागले आहेत. चारही प्रभागातील नागरिकांसाठी हे क्षेत्रीय कार्यालय प्रशस्त आणी सोयस्कर होईल असे तरी चित्र सध्या पहावयास मिळत आहे.
No comments:
Post a Comment