पिंपरी – शहराच्या गलबल्यात आणि घड्याळ्याच्या काट्यावर जागे होणारे शहर सनईच्या सुराने आणि शास्त्रीय संगीताच्या मधूर आस्वादाने जागे होते. पिंपरी-चिंचवड शहरात दिवाळीच्या पार्श्वभूमीवर वसुबारसेपासून ते भाऊबीजेपर्यंतच्या या पाच दिवसांत जवळपास 200 ते 250 दिवाळी पहाट शहरात साजऱ्या होत आहेत. याच दिवाळी पहाटने मात्र शहरातील छोट्या-कलाकारांना व्यासपीठ मोकळे करून दिले आहे आणि त्यातूनच पुढे नामाकिंत कलाकार उदयास आले आहेत. यंदाची दिवाळीची पहाट देखील शहरवासियांसाठी नक्कीच सुरेल होणार आहे.
No comments:
Post a Comment