Tuesday, 17 October 2017

दिवाळीमुळे फुलांना वाढली मागणी

पिंपरी – पावसामुळे फुलांची तोड होऊ न शकल्याने फुल बाजारात आवक कमी झाली. भाव मात्र गडगडले आहेत. मात्र, तरी देखील दिवाळीच्या पार्श्‍वभूमीवर राजा शेवंती व झेंडूला मागणी वाढली आहे.
येत्या दोन दिवसांत फुलांचे भाव वधारण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. फुलांचे दर प्रतिकिलो व बंडलनुसार पुढील प्रमाणे – झेंडू (साधा, पिवळा व कोलकत्ता) – 30 ते 40 रुपये किलो, कापरी 40 ते 50 रुपये, गुलछडी – 80 ते 100 रुपये किलो, लिली बंडल – 8 ते 10 रुपये, जरबेरा बंडल – 50 ते 60 रुपये, गुलाब गड्डी (साधा) – 15 ते 20 रुपये, गुलाब गड्डी (डच) – 60 ते 80 रुपये, अष्टर गड्डी (चार नग) – 10 रुपये, किरकोळ बाजारात कागडा गजऱ्याचा भाव प्रति नग 10 रुपये असून, डझनचा भाव 100 रुपये आहे, अशी माहिती सप्तश्रुंगी पुष्प भांडारचे गणेश आहेर यांनी दिली.

No comments:

Post a Comment