पिंपरी-चिंचवड महापालिकेत सत्तेत आल्यानंतर भाजपने नियमाने काम करून प्रशासकीय शिस्त लावली आहे. त्यामुळे काँग्रेस व राष्ट्रवादीतून शिवसेनेत गेलेल्या खासदार श्रीरंग बारणे यांना त्रास होऊ लागला आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीत असताना बारणे यांना निविदा न काढताच ठेकेदारांना थेट कामे देऊन मलिदा खाण्याची सवय होती. मात्र आता भाजपने अशा कारभाराला महापालिकेतून हद्दपार केले आहे. प्रत्येक काम निविदा काढूनच देण्याचा पायंडा पाडला जात आहे. त्यामुळे खासदार बारणे यांनी ठेकेदारांची दलाली करण्यापेक्षा जनसेवेसाठी स्वतः हातात झाडू घेऊन शहराची स्वच्छता करावी. अपयशी खासदार म्हणून नावलौकिक प्राप्त केलेल्या बारणे यांनी महापालिकेत कसा कारभार करावा, हे भाजपला शिकवू नये, अशी घणाघाती टिका सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी केली आहे.
No comments:
Post a Comment