Wednesday, 1 November 2017

खेडच्या हद्दीत प्रवेश करताच वाहतूक कोंडीची साथ

चाकण- पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर तसेच तळेगाव -शिक्रापूर रस्त्या जवळ असलेल्या औद्योगिक वसाहतीत जाणाऱ्या रस्त्यावरून अवजड वाहने सर्रास धोकादायक पद्धतीने चालविण्यात, वळविण्यात येत आहेत. त्यामुळे अशा बेशिस्त रहदारीमुळे या महामार्गावरील आंबेठाण चौक, चिंबळी फाटा, मुऱ्हे वस्ती, कुरुळी, निघोजे गावांकडे जाणारे रस्ते व चौक व विशेषतः आळंदी फाट्या जवळील औद्योगिक वसाहतीत जाणारा रस्ता वाहतूक कोंडीला निमंत्रण देणारा आणि धोकादायक ठरत आहेत. मोशी येथील टोलनाका ओलांडून पुढे खेड तालुक्‍याच्या हद्दीत प्रवेश केल्यानंतर प्रत्येक चौकात वाहतुकीची कोंडी नित्याचीच आहे. मागील अनेक वर्षे वाहतूक कोंडीच्या समस्याने ग्रासलेल्या वाहनधारकांची या संकटातून सुटका कधी होणार असा यक्ष प्रश्‍न निर्माण झाला आहे. या रस्त्यांच्या कामांसाठी निधी मंजूर असल्याने पुढील काळात सुरुवात होईलच मात्र, तो पर्यंत दररोजच्या त्रासाला नागरिकांना तोंड द्यावे लागत आहे.

No comments:

Post a Comment