Wednesday, 1 November 2017

विजेच्या प्रश्नाबाबत खासदार श्रीरंग बारणे यांनी घेतली आढावा बैठक

पिंपरी चिंचवड शहरामध्ये विजेचा लपंडाव गेली अनेक दिवसांपासून चालू आहे. थेरगाव, काळेवाडी, वाकड, ताथवडे, पुनावळे, किवळे, रावेत तसेच सांगवी, पिंपळे सौदागर या भागात लाईटच्या अनेक समस्या आहे. विद्युत वितरण कंपनीचे अधिकारी नागरिकांच्या तक्रारीची दखल घेत नाहीत. अनेक वेळा ऑफिसमधील फोन उचलून ठेवला जातो. अशा अनेक तक्रारी नागरिकांनी खासदार श्रीरंग बारणे यांचे कडे केल्या होत्या त्या तक्रारीची दखल घेऊन खासदार श्रीरंग बारणे यांनी आज पुणे विभागाचे मुख्य अभियंता एम.जी. शिंदे यांच्या उपस्थितीत पिंपरी येथे विद्युत वितरण कंपनीच्या कार्यालयात बैठक घेतली. या बैठकीत विद्युत वितरण कंपनीचे अधिक्षक महेंद्र दिवाकर, नगरसेवक निलेश बारणे, सचिन भोसले, रेखा दर्शिले, माई काटे, गजानन चिंचवडे व विद्युत विभागाचे सर्व अधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment