Sunday, 19 November 2017

माजी लोकप्रतिनिधी, सदस्यांचे नामफलक हटवा; अमोल थोरात यांची आयुक्तांकडे मागणी

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या विविध समित्या आणि मंडळाच्या माजी सदस्यांसह माजी लोकप्रतिनिधींचे निवासस्थान, संपर्क कार्यालय यांची माहिती देणारे फलक आणि त्यांचे नामफलकही शहरात मोठ्या प्रमाणात आहेत. या माजी सदस्य आणि माजी लोकप्रतिनिधींकडून कार्यकाळ संपल्यानंतरही केवळ सर्वसामान्यांची दिशाभूल करण्यासाठी असे फलक मोठ्या प्रमाणात लावण्यात येत आहेत. असे नामफलक हटविण्यात यावेत, अशी मागणी भाजपचे पिंपरी चिंचवड शहर जिल्हा सरचिटणीस अमोल थोरात यांनी केली आहे.

No comments:

Post a Comment