Saturday, 18 November 2017

आयुक्तांना सल्ला देण्यासाठी सल्लागार नेमावा

पिंपरी – महापालिकेत वर्ग एक, दोनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना गलेलठ्ठ पगार मोजूनही शहरात किरकोळ कामांवर देखील सल्लागार नेमणूक करण्यात येत आहे. त्यामुळे आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांना सल्ला देण्यासाठी पालिकेत सल्लागार नेमण्यात यावा, तसेच त्या सल्लागाराचा येणारा सर्व खर्च उचलण्याची तयारी माझी आहे, अशी उपरोधिक मागणी सामाजिक कार्यकर्ते रमेश वाघेरे यांनी केली आहे. याबाबत त्यांनी आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांना निवेदन सादर केले आहे.

No comments:

Post a Comment