Saturday, 18 November 2017

शहरातील नाट्यगृहे रंगकर्मींना देण्यास प्राध्यान्य द्यावे – अमित गोरखे

पिंपरी चिंचवड शहरातील कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध व्हावे, नागरिकांना सांस्कृतीक कार्यक्रमांचा आस्वाद घेता यावा. यासाठी महापालिकेने शहरात चार नाट्यगृहांची निर्मिती केली आहे. मात्र, त्याचा वापर सांस्कृतीक कार्यक्रमापेंक्षा इतर खासगी कार्यक्रमांसाठी जास्त प्रमाणात केला जात असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे महापालिकेने महिन्यातील चार रविवार सांस्कृतीक कार्यक्रमांसाठी नाट्यगृहे आरक्षित ठेवावीत, अशी मागणी संस्कार भारती आणि कलारंग संस्थेचे अध्यक्ष अमित गोरखे यांनी महापालिकेकडे केली आहे.

No comments:

Post a Comment