Thursday, 30 November 2017

…अखेर टेनिस कोर्टात प्रस्तावाचा “गोल’!

  • विरोधकांच्या मतदानानंतर मंजुरी: आयुक्‍तांनी केला सविस्तर खुलासा
पिंपरी, (प्रतिनिधी) – चेन्नई येथे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या ओपन टेनिस स्पर्धा भरविण्यात अपयशी ठरलेली असोसिएशन ऑफ टेनिस प्लेअर्स (एटीपी) क्रीडा क्षेत्रातील नामांकीत संस्थेने पुण्यातील बालेवाडीच्या शिवछत्रपती क्रीडा संकुलात यापुढे सलग पाच वर्षे आंतरराष्ट्रीय ओपन टेनिस स्पर्धा भरविण्यास राज्य शासनाला होकार दिला आहे. त्यानुसार संस्थेच्या खर्चाचा बोजा शासकीय अस्थापनांसह पिंपरी-चिंचवड महापालिकेवर टाकण्यात आला आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेने एका वर्षाला एक कोटीप्रमाणे पाच वर्षांसाठी पाच कोटी रुपये द्यावेत, अशी सूचना राज्य सरकारने आयुक्तांना दिली आहे. मात्र, या स्पर्धेचा शहरातील एकाही टेनिसपटूला फायदा होणार नाही. त्यामुळे नागरिकांच्या कराचे पाच कोटी वायफळ जाणार आहेत, अशा शब्दांत विरोधकांनी या विषयाला विरोध केला. शेवटी आयुक्‍तांनी स्पर्धेचा सविस्तर खुलासा करताच विरोधकांचे मतदान घेऊन महापौर नितीन काळजे यांनी प्रस्तावाला मंजुरी दिली.

No comments:

Post a Comment