Thursday, 30 November 2017

“वायसीएम’ रुग्णालयावर बहुमजली इमारत उभारणार

महासभेत मान्यता ः ऐनवेळी शंभर कोटीचे विषय दाखल

पिंपरी, (प्रतिनिधी) – महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय इमारतीवर आता बहुमजली इमारत बांधण्यात येणार आहे. याकरिता 50 कोटी रुपयांच्या सुधारीत खर्चाचा विषयासह नाशिक फाटा ते वाकड बीआरटी कॉरीडॉरमध्ये सुदर्शननगर चौकात ग्रेडसेपरेटर बांधण्यास 20 कोटी, तळवडे जकात नाका ते देहूगाव रस्ता विकसित करण्यास 30 कोटी असे एकूण 100 कोटी रुपये खर्चास प्रशासकीय मान्यता घेण्यासाठी हे प्रस्ताव तातडीची बाब म्हणून महासभेत दाखल केला होता, त्याला मंगळवारी मान्यता देण्यात आली. या सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर नितीन काळजे होते.

No comments:

Post a Comment