देहूरोड - रस्ते विकास महामंडळातर्फे पुणे-मुंबई महामार्गाचे निगडी ते देहूरोडदरम्यान चौपदरीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. निगडी दिशेला देहू फाटा ते एमईएस पंप हाउसदरम्यान काही ठिकाणचा अपवाद वगळता चारही लेनचे ७० टक्के काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे या लेनवरून वाहतूक वळविल्याने महामार्गावरील सुरक्षितता वाढली आहे. परिणामी संभाव्य अपघातांची शक्यताही कमी झाली आहे.

No comments:
Post a Comment