Saturday, 9 December 2017

सायकल मिळाली? …आम्ही नाही पाहिली!

– लाभार्थींची यादी गायब :चार हजार सायकलींचा घोळ उघड 
– महापालिकेचा कारभार : लेखा परिक्षणात दीड कोटींला आक्षेप
विकास शिंदे 
पिंपरी – महापालिका नागर वस्ती विकास योजनेतून आठवी ते बारावीतील आर्थिक दुर्बल मुलींना व मागास विद्यार्थ्यांतील शिक्षणाची ओढ निर्माण व्हावी, त्यांना प्रोत्साहन मिळावे, यासाठी मोफत सायकल वाटप करते. 2011-12 आर्थिक वर्षांत विविध योजनेंतर्गत सायकली वाटप करून 1 कोटी 39 लाख 32 हजार रुपये एवढा खर्च केला; मात्र त्या लाभार्थींची यादीच नागर वस्ती विभागातून गायब झाली. त्यामुळे सायकलींचे वाटप खरेच झाले का? की सव्वा कोटी रुपये खर्ची दाखवून ते पैसे हडप केले? याबाबत राज्य शासनाच्या स्थानिक निधी लेखा परिक्षणातून उघड झाले आहे.

No comments:

Post a Comment