परवाना नूतनीकरण निकष बदलले : फायर ऑडिटही लांबणीवर, ग्राहकांवर सुरक्षेची ‘संक्रात’
पुणे – ग्राहकांचा सर्वाधिक राबता असलेल्या अमृततुल्य ते पंचतारांकित हॉटेलांवर “संक्रात’ कोसळण्याची चिन्हे आहेत. या हॉटेलांच्या सुरक्षेच्या परवान्यांचे दरवर्षी नूतनीकरण बंधनकारक असतानाही महापालिका आणि अन्न व सुरक्षा प्रशासनाने या नूतनीकरणासाठी त्यांना सवलत दिली आहे. नव्या नियमानुसार या नूतनीकरणासाठी तीन ते पाच वर्षांचा कालावधी निश्चित केला आहे. त्यामुळे या हॉटेल्सचे वर्षाकाठी होणारे फायर ऑडिटही लांबणीवर पडले आहे. नव्या निकषांमुळे हे हॉटेल आणि विशेषत: ग्राहक “डेंजर झोन’ मध्ये आले आहेत.
No comments:
Post a Comment