पिंपरी - ‘‘पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील सुमारे २९ किलोमीटरपर्यंत लांबीच्या नाशिक फाटा ते चांडोली (खेड) या रस्त्याच्या सहा पदरीकरणासाठी केंद्र सरकारकडून मान्यता मिळाली आहे. या कामासाठी जवळपास एक हजार कोटींच्या खर्चास मंजुरी देण्यात आली आहे. भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणामार्फत त्याची निविदा प्रक्रिया येत्या दीड महिन्यात पूर्ण केली जाईल,’’ अशी माहिती आमदार महेश लांडगे यांनी दिली आहे.

No comments:
Post a Comment