पुणे – पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए) रिंग रोडचे काम हाती घेण्यात आले आहे. केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी भारतमाला प्रकल्पांतर्गत प्राधिकरणाच्या रिंगरोडचा समावेश करण्यात आला आहे. सुमारे 128 किलोमीटर लांबीचा आणि 110 मीटर रुंदीचा रिंगरोड असणार आहे. जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला एक यथोचित नावे मिळावे, यासाठी पीएमआरडीएने पुणे रिंगरोडसाठी नामकरण स्पर्धा आयोजित केली आहे. या नावामधून पुण्याचा सांस्कृतिक वारसा आणि आधुनिक दृष्टीकोन दिसून येणे अपेक्षित आहे. पीएमआरडीएच्या रिंगरोडसाठी योग्य असे नाव सुचविण्याचे आवाहन प्राधिकरणाचे आयुक्त किरण गित्ते यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment