पिंपरी - आपल्याकडे निर्माण होणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट कशी लावायची, असा प्रश्न अनेक कंपन्यांना पडतो. हिंजवडी आयटी कंपन्यांमधील ही समस्या लवकरच दूर होणार आहे. या कंपन्यांमध्ये निर्माण होणाऱ्या कचऱ्यातून सीएनजी गॅस निर्माण करून त्याचा पुरवठा याच कंपन्यांमधील किचनला करण्याची योजना महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने हाती घेतली आहे. येत्या दीड वर्षामध्ये हा उपक्रम कार्यान्वित होणार आहे.

No comments:
Post a Comment