Monday, 5 February 2018

श्रेयवादाचा “उद्योग’

राज्यातील नामवंत एमआयडीसी म्हणून नावारुपाला आलेल्या पिंपरी-चिंचवड शहरातील सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांना चालना देण्यासाठी केंद्र शासनाने पिंपरीत आंतरराष्ट्रीय दर्जाचा कार्यक्रम घेतला. या एकाच कार्यक्रमाची विभागणी करुन उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि केंद्रीय राज्यमंत्री गिरिराज सिंह यांच्या हस्ते दोनवेळा उद्‌घाटन केले. या दोन्ही नेत्यांनी कार्यक्रमात एकमेकांवर यथेच्छ चिखलफेक केली. त्यामुळे उद्योगजगताला उभारी देण्यासाठी आयोजित या कार्यक्रमाला राजकीय गालबोट लागले. शिवसेना आणि भाजपमधील अंतर्गत वितंडवाद असाच सुरु राहिल्यास त्याचा फटका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या “मेन इन’ला बसण्याची शक्‍यता आहे.

No comments:

Post a Comment