पिंपरी (जि. पुणे) - सौदी अरेबियाने नागरिकत्व दिलेल्या ‘सोफिया’ रोबो गेल्या काही दिवसांत संपूर्ण जगभरात चर्चेत असला, तरी पिंपरी-चिंचवडमधील अनिल जैन यांनी ‘रिअलिस्टिक ह्यूमनॉइड रोबो’ तयार केला आहे. रिअलिस्टिक प्रकारातील भारतातील पहिला ‘रोबो’ असल्याचा दावा त्यांनी केला असून, त्याच्या माध्यमातून ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’च्या दिशेने पाऊल उचलले आहे. या रोबोचे नामकरण ‘वीर’ असे करण्यात आले आहे.

No comments:
Post a Comment