पिंपरी - गेल्या तीन दिवसांपासून पतंगीच्या मांज्यामध्ये अडकलेली घार सुटकेसाठी प्रयत्न करीत होती. मांजामुळे तिला जखमाही झाल्या होत्या. तीन दिवसांत पोटात अन्नाचा कणही न गेल्याने जिवाच्या आकांताने ती ओरडत होती. अखेर पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अग्निशामक दलाने तिची रविवारी (ता. ४) दुपारी ४५ फूटांवरून सुखरूप सुटका केली.

No comments:
Post a Comment