Wednesday, 25 April 2018

भाजपने भ्रष्टाचारात राष्ट्रवादीला पछाडले !

पिंपरी – शिवसेनेच्या दोन्ही खासदारांनी पिंपरी चिंचवड पालिकेत सत्ताधारी असलेल्या भाजपवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले आहेत. मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी भाजपने राष्ट्रवादीलाही मागे टाकले असून, दुपटीने भ्रष्टाचार चालवला असल्याचा आरोप केला. तर खासदार आढळराव पाटील यांनी नाशिक फाटा ते खेड सहा पदरी रस्त्याच्या कामात अडथळा आणल्याचा आरोप केला. यावेळी दोन्ही खासदारांनी नामोल्लेख टाळत दोन्ही आमदारांवर न केलेल्या कामाचे श्रेय लाटण्याचाही आरोप केला.

No comments:

Post a Comment