पिंपरी – महाराष्ट्र राज्य सरकारने गुढीपाडव्याच्या दिवशी प्लास्टिक आणि थर्माकोलवर बंदी घातली. न्यायालयाने देखील या निर्णयास योग्य ठरवत बंदी कायम ठेवली. त्यानुसार पिंपरी-चिंचवड महापालिका आणि पर्यावरण संवर्धन समितीने प्लास्टिक आणि थर्माकोलमुक्त शहराचे मिशनफ हाती घेतले आहे. या मोहिमेला 19 एप्रिलपासून सुरुवात होणार असून 21 एप्रिल दरम्यान चालणाऱ्या या मोहिमेत प्लास्टिक, थर्माकोल संकलनाबरोबरच जनजागृती करण्यात येणार आहे.
No comments:
Post a Comment