पिंपरी-चिंचवड महापालिका आणि पर्यावरण संवर्धन समितीने प्लास्टिक आणि थर्माकोलमुक्त शहराची मोहीम हाती घेतली असून, त्या अंतर्गत १९ ते २१ एप्रिलच्या कालावधीत जनजागृती करण्यात येणार आहे. राज्य सरकारने प्लास्टिक कचरा व्यवस्थापन नियम २०१६ अन्वये जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, सर्व प्रकारच्या प्लास्टिक पिशव्या, थर्माकोल आणि प्लास्टिकपासून तयार करण्यात येणाऱ्या व एकदाच वापरल्या जाणाऱ्या ताट, कप, ग्लास, काटे, वाटी, चमचे, भांडी आदी 'डिस्पोजेबल' वस्तू; तसेच हॉटेलमध्ये अन्नपदार्थ पॅकेजिंगसाठी वापरले जाणारे प्लास्टिक भांडे आणि वाटी, स्ट्रॉ, द्रव पदार्थ साठविण्यासाठी वापरात येणारे प्लास्टिक पाउच, अन्नपदार्थ, धान्य साठविण्यासाठी आणि पॅकेजिंगसाठी वापरले जाणारे प्लास्टिक व प्लास्टिक वेष्टन यांवर बंदी घालण्यात आली आहे. सजावटीसाठीच्या प्लास्टिक आणि थर्माकोलच्या वापरावरही बंदी घातली आहे. या विरोधात प्लास्टिक उत्पादकांनी कोर्टात धाव घेतली असून, कोर्टानेही निर्णय कायम ठेवत मुदत दिली आहे.
No comments:
Post a Comment