पुणे - पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) हद्दीसाठी तयार केलेल्या बांधकाम नियमावलीवर दाखल हरकती व सूचनांवरील सुनावणी पूर्ण झाली आहे. त्यामुळे लवकरच नियमावलीला अंतिम स्वरूप देऊन राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठविण्यात येणार आहे. नियमावलीत प्राधिकरणाच्या हद्दीत इमारतींची उंची 50 मीटरपर्यंत मर्यादित करण्याबरोबर टीडीआर वापरण्यावर मर्यादा घालण्यात आली असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

No comments:
Post a Comment