पिंपरी - शहरामध्ये महिलांसाठी रहिवासी भाग, झोपडपट्टी क्षेत्र, उद्याने आदी ठिकाणी सार्वजनिक स्वच्छतागृहांची उपलब्धता आहे. मात्र, चार प्रमुख बीआरटीएस रस्त्यांवर पुरुष व महिला मिळून केवळ २१ स्वच्छतागृहे आहेत. त्याशिवाय, अंतर्गत रस्त्यांवरही विदारक परिस्थिती पाहण्यास मिळते. या पार्श्वभूमीवर उद्योगांच्या व्यावसायिक सामाजिक जबाबदारी (सीएसआर) उपक्रमांतर्गत शहरातील प्रमुख रस्त्यांवर महिलांसाठी नव्याने काही स्वच्छतागृह उभारण्याचे नियोजन आहे.
No comments:
Post a Comment