चौफेर न्यूज – पिंपरी चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रातील गुरुवारी दि.१४ रोजी ‘अ’ क्षेत्रिय कार्यालयाचे कार्यक्षेत्राअंतर्गत मोरवाडी चौक ते पिंपरी कॅम्पकडे जाणाऱ्या रस्त्यावरील विनापरवाना अतिक्रमण काढण्यात आले. सदर कारवाईमध्ये ०१ – हातगाडी, ०१ टपाची हातगाडी, ०१ लोखंडी शटर, ०२ लोखंडी कांऊटर, ०१ लोखंडी टेबल, ०१ लोखंडी टपरी, ०२ लोखंडी बाकडे आदी साहित्य जप्त करण्यात आले. तसेच, ‘फ’ क्षेत्रिय कार्यालयाचे कार्यक्षेत्रा अंतर्गत थरमॅक्स चौक ते निगडीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील विनापरवाना अतिक्रमण काढण्यात आले. सदर कारवाईमध्ये ०३ टपाची हातगाडी, ०१ हातगाडी, ०३ लोखंडी टपरी इ. साहित्य जप्त करण्यात आले. सदर कारवाई अतिक्रमण पथकामार्फत करण्यात आली.
No comments:
Post a Comment