Saturday, 2 June 2018

दोन महिन्यात दीड लाखाचा दंड वसूल

पिंपरी – प्लॅस्टिक पिशव्या वापरावर बंदी असताना देखील त्याचा वापर केला जात आहे. त्याअंतर्गत गेल्या दोन महिन्यात आठ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत प्लास्टिकचा वापर करणाऱ्यांकडून तब्बल एक लाख 45 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. त्यामध्ये सर्वाधिक 45 हजार रुपयांचा दंड “फ’ क्षेत्रीय कार्यालया मार्फत वसूल करण्यात आला आहे. तर, भाजी मंडई, फेरीवाले, दुकानदारांकडून 2190 किलो ग्रॅंम प्लॉस्टिक कॅरीबॅग जप्त करण्यात आल्या आहेत, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे यांनी दिली.

No comments:

Post a Comment