पुणे - हस्तांतर विकास हक्काच्या (टीडीआर) व्यवहारांवर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने घेतला आहे. टीडीआर खरेदी-विक्री व्यवहाराची दस्त नोंदणी करताना रेडीरेकनरमध्ये दर्शविण्यात आलेल्या दराच्या किती टक्के मुद्रांक शुल्क आकारावे, याचा विचार सुरू असून लवकरच तो दर निश्चित करून त्यानुसार आकारणी करण्यात येणार आहे. तसे झाल्यास अशा व्यवहारांमध्ये होणारी मुद्रांक शुल्काची चोरी थांबण्यास मदत होणार आहे.
No comments:
Post a Comment