पिंपरी : नंदकुमार सातुर्डेकर
पिंपरी- चिंचवडचे महापौर नितीन काळजे यांच्या राजीनाम्यानंतर महापौर कोण होणार याबाबत प्रचंड उत्सुकता आहे. भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी राहुल जाधव यांच्यासाठी माळी समाजाला पुढे करत जोरदार लॉबिंग केले आहे. मात्र, महापालिका स्थायी समिती अध्यक्षपदासाठी ममता गायकवाड यांचे नाव अचानक पुढे आणून त्यांची वर्णी लावलेल्या आ. लक्ष्मण जगताप यांच्या खेळयांची लांडगे समर्थकांना काहीशी भीती आहे. ब्लॅक हॉर्सप्रमाणे ते आपल्या समर्थकाचे नाव महापौर पदासाठी पुढे आणू शकतात.

No comments:
Post a Comment