नवी सांगवी (पुणे) : " हरित क्रांती म्हणजे केवळ शेतीतून अन्नधान्य पिकविने असे नव्हे; तर सेंद्रीय खतांचा वापर करून आरोग्यवर्धक भाजीपाला लोकांपर्यंत पोहचवित असताना येणाऱ्या काळाची गरज पाहुन नैसर्गिक संपदा अधिकाधिक समृध्द करणे होय. " असे प्रतिपादन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांनी वाकड येथे केले. पिंपरी चिंचवड सहकारी गृहनिर्माण सोसायटी फेडरेशनच्या वतीने वाकड परिसरात एक हजार वृक्षांचे रोपन करण्यात येत असताना आज ( ता. 29 ) रोजी त्याचा शुभारंभ रोहन तरंग सोसायटीतून करण्यात आला. त्यावेळी उपस्थित नागरिकांना उद्देशून त्यांनी आपले विचार मांडले. यावेळी व्यासपिठावर सहायक आयुक्त दिलिप गावडे, नगरसेवक मयुर कलाटे, संदिप कस्पटे, सुदेश राजे, डॉ द्वारकानाथ खर्डे, डॉ किरण मुळे उपस्थित होते.
No comments:
Post a Comment