Wednesday, 18 July 2018

घरगुती कोचिंग क्‍लासेसवर कारवाई नाही

खासगी क्‍लासेससाठी कायदा आणणार

नागपूर – खासगी कोचिंग क्‍लासेसच्या नावाखाली राज्यात शिक्षणाचा बाजार मांडला गेला असतानाच घरामध्ये विद्यार्थ्यांची शिकवणी घेणाऱ्यांना राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे. राज्य सरकार खासगी कोचिंग क्‍लासवर नियंत्रण आणण्यासाठी कायदा करीत असला तरी 25 ते 50 मुलांना ट्यूशन देऊन रोजगार मिळवणाऱ्या गृहिणी तसेच तरुणांना या कायद्यातून वगळण्यात येणार आहे, असा निर्वाळा देतानाच अशा ट्यूशनवर कारवाई करण्यात येणार नसल्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी आज स्पष्ट केले.

No comments:

Post a Comment