पुणे - पाऊस पडतोय आणि प्रवासासाठी तुम्ही कॅब मोबाईलवरून बुक केली. १५-२० मिनिटांनंतर चालकाचा फोन येतो आणि सांगतो, मला फेरी शक्य नाही. माझ्याकडून फेरी कॅन्सल होत नाही. तुम्ही कॅन्सल करा आणि दुसरी कॅब बुक करा. प्रवाशाने कॅब कॅन्सल केली की, त्याचा भुर्दंड त्याला बसतो अन् कॅबही मिळत नाही. त्यातून मात्र कॅब कंपन्या आणि चालकाची प्रवास न करताही उत्पन्नाची चंगळ होते!

No comments:
Post a Comment