सर्वत्र अंधकार पसरलेला असताना कुठेतरी एखादा कवडसा दिसावा, तसा अनुभव सध्या पिंपरी चिंचवडकर घेत आहेत. खून, खंडणी, दहशतवाद, चोरी, लूटमार, हाणामारी, टवाळखोरी, गुंडागर्दीमुळे शहर बदनाम झाले होते. सर्व सोयींनीयुक्त असे हे सुंदर, समृद्ध शहर राहण्यायोग्य राहिले नव्हते. वाहतूक समस्येने लोक हैराण होते. रोजच्या वाहतूक कोंडीत मेटाकुटीला आलेल्या हिंजवडीतील चार लाख आयटी कर्मचाऱ्यांनी आणि काही उद्योजकांनीही ‘आता पुरे’ची भाषा सुरू केली होती. प्रशस्त रस्ते असूनही रोजचे अपघात सुरूच होते. बेशिस्त वाहनचालकांमुळे शिस्तबद्ध चालकांना अक्षरशः जीव मुठीत धरून वाहन चालवावे लागत होते. बाहेरून आलेल्या काही मुजोर रिक्षाचालकांमुळे सर्व रिक्षाचालकांची नालस्ती झाली होती. थोडक्यात गुन्हेगारी आणि एकूणच वाहतूक समस्येने सर्वसामान्य नागरिकांना नको नको झाले होते, कहर झाला होता. अशा परिस्थितीत आर. के. पदमनाभन् यांच्यासारखा पहिलाच एक ‘सिंघम’ पोलिस आयुक्त शहराला लाभला.
No comments:
Post a Comment