पुण्याच्या धर्तीवर पिंपरीतही माजी महापौरांची संघटना
निगडीत महापौर निवासस्थान उभारणार : राहुल जाधव
पिंपरी-चिंचवड : शहरातील कॅन्सरच्या रुग्णांना उपचारासाठी पुण्यात जावे लागते. त्यामुळे महापालिकेच्या वतीने शहरात प्रशस्त कॅन्सर रुग्णालय बांधण्यात यावे. त्यासाठी दोन एकर जागा आरक्षित ठेवण्यात यावी, अशी मागणी शहराच्या माजी महापौरांनी केली. तसेच माजी महापौरांसाठी पालिका मुख्यालयात कार्यालय करावे, वैद्यकीय विमा चालू करावा, पालिकेच्या कार्यक्रमांना बोलविण्यात यावे. मेट्रो निगडीपर्यंत नेण्यात यावी, मेट्रोला पिंपरी-चिंचवड मेट्रो नाव द्यावे. आंद्रा-भामा आसखेड, पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्प मार्गी लावावा, अशा सूचना देखील त्यांनी केल्या आहेत. त्याचबरोबर पुण्याच्या धर्तीवर पिंपरीत देखील माजी महापौरांची संघटना स्थापन करण्यात येणार आहे. दरम्यान, महापौरांच्या निवासस्थानासाठी निगडीत आरक्षण आहे. त्याठिकाणी महापौर निवास्थान बांधण्यात येणार असल्याचे, महापौर राहुल जाधव यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment