पिंपरी – इलेक्ट्रॉनिक रिक्षांना केंद्र सरकारने परवानगी दिली असून या रिक्षांना परवान्याची आवश्यकता राहणार नाही, असे केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी नुकतेच जाहीर केले आहे. मात्र, हे परवाने वाटप करताना रिक्षा चालकांना विश्वासात घ्या, अशी मागणी रिक्षा चालकांच्या शिष्टमंडळाने गडकरी यांच्याकडे केली आहे. त्याबरोबर विविध मागण्यांचे निवेदन गडकरी यांना सादर केले. या शिष्टमंडळात दिल्ली रिक्षा टॅक्सी संघटनेचे नेते राजेंद्र सोनी, अचल सिंग, मधुकर थोरात, मारुती कोंडे, मोशवीर लोकरे, सुनील बोर्डे, विजय पाटील, श्रीरंग जाधव यांचा समावेश होता.
No comments:
Post a Comment